गेल्या काही वर्षांत नवनवीन अनुभव येत होते.मनात भावना कोंडत, दाटत चालल्या होत्या.असह्य झालेल्या या भावनांचा बांध फुटून अश्रूं ऐवजी या सर्व शब्दरूपाने बाहेर पडू लागल्या.आयुष्यात आलेल्या चांगल्या,वाईट,कडू,गोड, अनुभवांचा उदय या काव्यसंग्रहातून झाला.
आयुष्य नावाच्या नौकेतून प्रवास करताना मोठमोठ्या लाटांचा,त्सुनामी चा कधी भरती तर कधी ओहोटी च सामना करावा लागतो.आणि सर्वांच्या सोबतीने हा जीवनप्रवास सुखकर नि रुचकर करावा लागतो.
प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या साहाय्याने मी ही मनुष्य जीवनातल्या अनुभवांचा नि सुखदुःखा चा प्रवास मांडला आहे.मी या संग्रहात “आयुष्य”,”जीवन” या शब्दांचा मुद्दामच जास्त वापर केला आहे, जेणेकरून आपणास या जन्माचे रहस्य समजावे..
एकदा आपल्या या जीवनाचा प्रवास “खेळ शब्दांचा, मेळ भावनांचा” या संग्रहासोबत नक्की करून बघा…..
मनिषा रमेश घाडगे
Nitya Publications, Bhopal MP, India is a fast growing publisher and serving at national and international level. We are publishing all type of books like educational books, seminar / conference proceeding, reports, thesis, story books, novels, poetry books and biographies etc with ISBN.