उत्तरेतील दिगंबर जैन समाजात रोटीबेटीव्यवहार हे जातीनिहाय होत असतात. त्यामुळे अग्रवाल जैनांमध्ये आणि वैष्णव अग्रवालांमध्ये रोटीबेटी व्यवहार सर्रास होत असत. अशा विवाहसंबंधांतून जैन घरांमध्ये सून म्हणून आलेल्या मूळ वैष्णव अशा दोन सुनांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जैन समाजाची अमिट छाप सोडली आहे. त्यापैकी पहिल्या म्हणजे आरा (बिहार) येथील प्रख्यात जैन बालाविश्राम या स्त्री शिक्षण संस्थेच्या संस्थापिका ब्रह्मचारिणी चंदाबाई. वयाच्या बाराव्या वर्षी अकाली वैधव्य आल्यावर त्यांनी आपल्या पित्यासमान असलेल्या मोठ्या दीरांच्या- बाबू देवकुमारजी जैन- यांच्या प्रेरणेने शिक्षणाची सुरुवात करून उत्तर भारतातील मागासलेल्या जैन समाजात १९०७ मध्ये स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली. अशी एक दुसरी सून म्हणजे साहू शांतिप्रसाद जैन यांच्या सुविद्य पत्नी आणि भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक रमारानी जैन. या प्रख्यात उद्योजक रामकृष्ण दालमिया यांच्या कन्या होत. त्यांनी आपल्या कर्तृत्ववान पतीच्या पाठिंब्याने ज्ञानपीठ पुरस्कारांची स्थापना केली आणि भारतीय ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि साहित्याची आणि विशेषतः जैन साहित्याची ओळख जगाला करून दिली. हे कुटुंब टाइम्स ऑफ इंडिया या आघाडीच्या वृत्तपत्राचे मालक होते आणि आहे. याच ज्ञानपीठाने ज्ञानपीठ लोकोदय ग्रंथमालेच्या माध्यमातून “जैन जागरण के अग्रदूत” नावाचे खूपच वाचनीय पुस्तक छापले होते. १९५२ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा विषय होता एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात जैन समाजात, विशेषतः उत्तरेतील जैन समाजात, जे विचारवंत आणि पुढारी झाले त्यांची ओळख करून देणे. योगायोग म्हणजे या पुस्तकात ज्या तीन स्त्रियांच्या चरित्राचा समावेश आहे त्यात एक आहेत ब्रह्मचारिणी चंदाबाई.
Nitya Publications, Bhopal MP, India is a fast growing publisher and serving at national and international level. We are publishing all type of books like educational books, seminar / conference proceeding, reports, thesis, story books, novels, poetry books and biographies etc with ISBN.