-20%

Social Share

महत्वपूर्ण वैष्णव शिक्षा Mahatvapurn Vaishnav Shiksha

250.00 Original price was: ₹250.00.200.00Current price is: ₹200.00.

Name of writers /editors :

ISBN :

No. of Pages :

Size of the book :

Book Format :

Name of Publisher :

Edition :

सदानंद दास Sadanand Das

978-93-5857-528-6

112

A5

Paperback

Nitya Publications

First

-20%

महत्वपूर्ण वैष्णव शिक्षा Mahatvapurn Vaishnav Shiksha

250.00 Original price was: ₹250.00.200.00Current price is: ₹200.00.

Social Share

Facebook
Twitter
LinkedIn

Description

मुळ लेखक प्रस्तावना

 

गेल्या अनेक वर्षांत, माझ्या प्रवासादरम्यान आणि हरि कथांदरम्यान, मला वैष्णव धर्माच्या मूलभूत शिक्षांवर सर्व भक्तांना सहज समजेल असे एक साधे पुस्तक लिहिण्याचा  वारंवार आग्रह करण्यात आला आहे. जरी मी या कामासाठी पूर्णपणे अयोग्य असलो तरी, वैष्णवांचे नम्र निवेदन पूर्ण करणे हे माझे कर्तव्य मानले आणि हे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला.

या पुस्तकात, मी माझे गुरुदेव श्रील भक्ती प्रमोद पुरी गोस्वामी ठाकूर यांच्याकडून, शास्त्रांमधून व गुरुवर्गांकडून ऐकलेल्या आपल्या संप्रदायाच्या शिक्षांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. वैष्णव तत्वज्ञानाचे प्रत्येक पैलू कोणत्याही बदलाशिवाय, कोणत्याही बनावट कल्पनांशिवाय सादर करण्याचा मी नेहमीच अथक प्रयत्न केला आहे.

आजकाल, वैष्णव तत्वज्ञानाच्या मूलभूत तत्वांवर तर्क – वितर्क करणे जगभरात सामान्य झाले आहे, परंतु जेव्हा श्रील प्रभुपाद भक्तीसिद्धांत सरस्वती गोस्वामी ठाकूर यांनी गौडीय मठाची स्थापना केली तेव्हा भगवान  चैतन्य महाप्रभूंचे जन्मस्थान (योगपीठ मंदिर) पुनर्स्थापित करणारे श्रील भक्ती विनोद ठाकूर यांच्या लेखनात आणि ग्रंथांमध्ये ही तत्वे कधीही वादग्रस्त नव्हती.

हे पाहून खूप दुःख होते की हे महापुरुष या जगातून अप्रकट झाल्यानंतर इतक्या कमी काळातच आत्म्याचे स्वरूप, गुरु तत्व, साधना आणि वैष्णव शिष्टाचार याबद्दल इतके गैरसमज पसरले आहेत. मूलभूत तत्वांमध्येही फेरफार, भेसळ आणि विकृतीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक जीवाला प्रामाणिक शिष्य परंपरेद्वारे सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की आपण अशा अद्भुत गुरुवंशातील आहोत ज्यांचे गुण असाधारण आणि अतुलनीय आहेत.

या पुस्तकाच्या प्रकाशनाद्वारे श्रीगुरु वर्गांच्या या मिशनची सेवा करण्याच्या माझ्या प्रयत्नात माझ्याकडून कोणतीही चूक किंवा अपराध होऊ नये अशी मी प्रार्थना करतो.

 

श्रीगौरपौर्णिमा तिथी                           दासानुदास,

५३३ गौराब्द                                   श्रील भक्ती बिबुध बोधायन

२१ मार्च २०१९