‘ये कैसा रिश्ता’ चे कादंबरीकार डॉ. सूरज सिंह नेगी कुशल आणि प्रशासनिक अधिकारी तर आहेच ह्या शिवाय साहित्य साधक. मृदुभाषी आणि पाती मोहिमे चे सार्थक सूत्रधार पण आहे. एखादा चित्रपट बघावा असेच ही कादंबरी वाचतांना जाणवते. पहाड, पाणी, पर्यावरण, पर्यटन , प्राकृतिक सौंदर्य या सर्वांचे वर्णन वाचतांना निसर्गाचे कोंमल चित्रण आपल्या कवितेतून करणारे ‘सुमित्रानंदन पंत’ डोळ्यांसमोर उभे राहतात.
कादंबरीची भाषा शैली सौम्य आणि आंचलिक तर आहेच शिवाय देशज शब्द आपला वेगळा प्रभाव पाडतात. फणीश्वर नाथ रेणूंची ‘मैला आँचल’ ही कादंबरी वाचकांना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्याच्या ‘मेरीगंज’ ग्रामीण भागांतील लोकांच्या जीवनाकड़े खेंचते तशीच डॉ. सूरज सिंह नेगीची ही कादंबरी वाचकांचे लक्ष वेधून घेते. आंचलिक लोकांचे राहणीमान, त्यांतील गोडवा, तिकडची घोर गरीबी, सावकाराकडून होणारे आर्थिक शोषण, शिक्षणाचा अभाव, पक्षपाती राजकारण, कुटुंबातील वैमनस्य हे उपन्यास सम्राट ‘मुन्शी प्रेमचंदांची’ आठवण करून देते. एकंदरीत ह्या तिन्ही साहित्याकारांचा हा छानसा त्रिवेणी संगमच आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागतो.