Description
काव्य ही साहित्य प्रांतातील सर्वोत्तम अभिव्यक्ती असते याबद्दल दुमत नसावे. कारण काव्यप्रतिभा म्हणजे अंतरंगातील सशक्त भाव – भावनांचा उत्स्फूर्तपणे ओसंडून वाहणारा प्रवाहच. अशाच प्रवाही भाव कल्पनांचे, विचारांचे आशयघन शब्दात अभिव्यक्त होणे म्हणजे सौ. मंजरी मार्लेगावकर यांचा ‘काव्यतुरा’ हा प्रथम काव्यसंग्रह. काव्य अल्पाक्षरी असते पण दीर्घार्थी असल्याने रसिकांशी लगेच जवळीक साधते.